पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपण्याची शक्यता असणार आहे. कारण, नागपुरातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, दोन रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे.
नागपुरातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेत सल्लागार (आयु.) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. संबंधित पदांसाठी मुलाखत ही प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसार जवळ, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४००२४ (एम.एस.) येथे घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ccras.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.