नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तसेच अजित पवार गटातील आमदारांचा आकडा 53 वर लवकरच पोहचणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. मंत्री आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शरद पवार गटाचे जे नेते दावा करत फिरत आहे की, आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहे. परंतु, दावा करणारेच आमदार जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात आहे. अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी उपमुख्यमंत्री हे आमदाराची बैठक घेतात. त्यांच्या मतदारसंघातल्या समस्या ऐकून घेतात. हे पूर्वी होत नव्हतं म्हणूनच सर्व आमदारांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार गटात येऊन सर्व आमदार खूश आहेत.
काय म्हणााले होते जयंत पाटील?
अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात असून अनेक जणांना परत पक्षात यायचे आहे. याबाबत विचारही सुरु आहे. मात्र, अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी केल होता.
हेही वाचा: