घाटंजी, (यवतमाळ) : घाटंजी शहरातील शिवाजी वार्डात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या कारवाईत आरोपीकडून 700 रुपये रोख रक्कम, मोबाईल व ॲक्टीवा मोपेड असा 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 18) करण्यात आली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक राजेश पंडित यांनी फिर्याद दिली आहे.
सागर सुरेश पवार (वय 50, पंचायत समिती जवळ घाटंजी), अमर उर्फ अमोल दिलीप गेडाम (वय 25, इंदिरा आवास घाटी, घाटंजी), अवधूत नन्नूसिंग जोधा (वय 38, आनंद नगर घाटंजी), अमोल मनोहर शेंडे (वय 31, विद्याभवन वार्ड, घाटंजी), सुरज सुधाकर चौधरी (वय 32, आनंद नगर, घाटंजी), शाहरुख अय्युब पठाण (वय 21, सुभाष वार्ड, घाटंजी) व उमेश पांडुरंग मोहूर्ले (वय 35, दुर्गामाता वार्ड, घाटंजी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी शहरातील शिवाजी वार्डातील सागर पवार यांच्या घरामागे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, जमादार राहुल खंडागळे, पोलिस हवालदार दिनेश जाधव, पोलिस हवालदार नितेश छापेकर व पंच असे खाजगी वाहनाने जुगार खेळत असलेल्या ठिकाणी दाखल झाले.
त्यावेळी सागर पवार याच्या घरामागे काही व्यक्ती 52 पत्त्यांचा एक्का बादशाह नावाचा हार जितचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 700 रोख रक्कम, मोबाईल व ॲक्टीवा मोपेड असा 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित, जमादार राहुल खंडागळे, पोलिस हवालदार दिनेश जाधव व पोलिस हवालदार नितेश छापेकर यांनी केली.