भंडारा : शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देऊन त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित करण्याचा सरकारचा हेतू होता. मात्र भंडारा जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांनीच डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना पोषण आहात ना अंडी मिळत होती. ना केळी मिळत होती. पण त्याची बिलं जिल्ह्या परिषदेकडून वसूल करण्यात येत होती.
प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतून आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी आहारात देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कुपोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून कुपोषणावर मात करण्यासाठीदेखील ही उपाययोजना करण्यात आली. त्यासाठी सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
मात्र विद्यार्थ्यांच्या जेवणावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्राथमिक शाळेत उघल झाला आहे. एका शिक्षकाचे रिटायरमेंट असल्याने त्याच दिवशी अंडी दिली असल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले आहे. पालकांनी सुध्दा या चौकशीची मागणी केली आहे. बुधवारी अंडी आणि केळीची डिलिव्हरी होते.
पालकांनी केली चौकशीची मागणी
संतप्त पालकांनी शिक्षकांच्या या कृतीचा निषेध केला आहे. शिक्षक मुलांना फक्त पौष्टिक आहार देतात, अंडी आणि केळी देत नाहीत. एका शिक्षकाच्या निवृत्तीमुळे त्याच दिवशी अंडी दिली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकरणी पालकांनी सुध्दा या चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात संताप दिसून येत आहे.
शिक्षणाधिकाऱ्याकडून कारवाईचे आदेश
राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार अनुदानीत शाळेत मुलाना अंडी देणे बंधनकारक आहे. शासन त्या शाळेला 5 रूपये दराने पैसे सुध्दा देत आहे. जर शाळेत विद्यार्थ्याना अंडी दिली जात नसेल तर याची चौकशी करुण पुढील कारवाही केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.