भंडारा : स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने मोटरपंप व दुचाकी चोरणाऱ्या चार जणांना मुद्देमालासह अटक केली. रोहित सिद्धार्थ खोब्रागडे (२० वर्षे), सत्यपाल सिद्धार्थ खोब्रागडे (३१ वर्षे), शंकर चिंदू भोयर (२४ वर्षे) व हिरामण धनराज वाघाडे (४५ वर्षे, सर्व रा. किटाडी) असे आरोपींचे नाव आहे.
आरोपींकडून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३ मोटरपंप, ४ (डिजेल इंजिन) मोटरपंप, २ मोटरसायकल असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथकाने जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आहे.
आरोपींनी पोलीस स्टेशन पालांदूर, साकोली, आंधळगाव, लाखनी, पवनी, अड्याळ, कारधा, करडी अंतर्गत ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून वर नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले ३ मोटरपंप, ४ (डिजेल इंजिन) मोटरपंप, २ मोटरसायकल असा एकूण मुद्देमालावर जप्ती कारवाई करून पुढील तपासाकरिता आरोपींसह पालांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार कृणाल कडव, योगेश ढबाले, चापोना. आशिष तिवाडे, चापोअं कौशिक गजभिये आदींनी केली.