आर्णी (यवतमाळ) : मकरसंक्रांती हा सण तोंडावर आला असल्याने लहान मुले पतंग उडवू लागले आहेत. अशाच प्रकारे पतंग उडवीत असताना विद्युत तारेला अडकलेली पतंग काढताना एका मुलाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. यामध्ये विजेचा जोरदार झटका लागल्याने बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे घडली आहे. रितेश संजय सुरजुसे (वय १२) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथील १२ वर्षीय बालक रितेश संजय सुरदुसे हा सकाळी घराच्या छतावर पंतग उडवित होता. पतंग उडवत असतांना त्याची पतंग घराच्या भिंतीला लागुन असलेल्या ईलेट्रीक पोलच्या तारांमध्ये अडकून पडली. यामुळे अडकलेला पतंग काढण्यासाठी त्याने कुठलाही विचार न करता त्या विद्युत तारात अडकलेली पंतग काढण्याचा प्रयत्न केला. यात त्याला जबर विदुयत शॉक लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यृ झाला आहे.
घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. काही वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरविलेल्या रितेशने सुध्दा अपघाती मृत्यृ झाल्याने कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. रितेश याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.