-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथील पैनगंगा नदी पात्रातून (दि. 30 ऑक्टोबर) रोजी रात्री 2 वाजता रेतीचा अवैध उपसा करताना घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा पथकांनी छापा टाकला. त्यावेळी 5 ट्रक्टर आणि ट्रॉली जप्त केले. सदरची कार्यवाही विधानसभा निवडणुकीत असलेल्या महसुल पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे MH 29 AK 1218 (ट्रक्टर चालक व मालक सै. अफरोज सै. अमीर, रा. जांब ता. घाटंजी), MH 29 CB 7153 (ट्रक्टर मालक शुभम उपनर रा. लोहारा ता. यवतमाळ व चालक अतुल कुडमते रा. ताडसावळी ता. घाटंजी), MH 29 CB 2085 (ट्रक्टर चालक व मालक गिरधर जैस्वाल रा. कापेश्वर ता. आर्णी), MH 29 CB 0103 (मालक अमोल राठोड व चालक गब्बरसिंग चव्हाण दोघेही रा. गोविंदपूर ता. घाटंजी) व MH 29 BP 3892 (ट्रक्टर चालक व मालक जिवन चव्हाण रा. हरलाल हेटी ता. आर्णी) आदी 5 ट्रक्टर व ट्रॉली जप्त करुन पारवा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही घोटी येथील मंडळ अधिकारी मानिक गोहोकार, शिरोली येथील मंडळ अधिकारी अनिल येरकर, ताडसावळी येथील तलाठी रामेश्वर कुमरे, ग्रामसेवक नेव्हारे, घाटंजी तहसीलदाराचे वाहन चालक अभिजीत तिवारी, कोतवाल इस्तारी आपतवार, कोतवाल गजानन गेडाम, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील सलाम शेंबाडे, पोलिस कान्स्टेबल रवि सलाम आदींनी केली. ताडसावळी येथे विधानसभा निवडणुक रणधुमाळीच्या काळात रेतीचे 5 ट्रक्टर आणि ट्रॉली एकत्र महसुल विभागाने जप्त केल्याने घाटंजी तालुक्यात मात्र खळबळ माजली आहे.