घाटंजी, (यवतमाळ) : सार्वजनिक बांधकाम मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग राजरोसपणे आपला मणमानी कारभार चालवत आहे. घाटंजी नगर परिषद हद्दीत मागील दोन वर्षात १० – १२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. या कामांची निवीदा सर्वसमान सु.भे.अ, खुल्या निवीदा तसेच मजुर कामगार सोसायटी यांच्यात वाटप करायला हवे होते.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दबावात या निविदांचे ९५% वाटप हे फक्त मजुर कामगार सोसायटींलाच केले आहे. जेणेकरुन स्थानिक लोकप्रतिनीधींचा आर्थिक लाभ होईल व त्याच्यांच निकटवर्तीयांना ती कामे करता येईल. या संपुर्ण प्रकरणाची माजी खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांनी देखील अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांचे कडे तक्रार केली होती.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग ते सार्वजनिक बांधकाम मंडळ निद्राअवस्थेत असल्यामुळे त्यांनी त्या तक्रारीवर कुठलीही चौकशी तसेच कारवाई केली नाही.
तक्रारदार निखिल राजेंद्र देठे यांनी देखील वारंवार या सर्व प्रकरणात अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ आदींकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रत्येकवेळी लेखी तक्रारीच्या प्रति व प्रतिलीपी जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या. मात्र, निद्राअवस्थेत असणाऱ्या प्रशासनाला स्थानिक गुर्मीमुळे जाग आली नाही. त्यामुळे पुन्हा २० ॲागस्ट रोजी निखील देठे यांनी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांना प्रत्यक्ष भेटुन लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येत्या आठवड्यात सदर तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास २६ ॲागस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे २६ ऑगस्ट रोजी ३२ कामांचे वाटप सर्वसमान करण्यास व मागे वाटप झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यास अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ व सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ यांच्या दालनासमोर आमरण उपोषनास बसण्याचा इशारा निखील देठे यांनी प्रशासनाला दिला आहे.