नागपुर : नागपुरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असूनघटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही धक्कादायक घटना घडली असून पती पत्नी आणि दोन मुलांचा यामध्ये समावेश आहे. एकाच घरात चार मृतदेह दिसून आल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. चौघांनी आत्महत्या का केली? या मगच कारण मात्र अद्याप उघड होऊ शकले नाही.
विजय पचोरी, पत्नी मालाबाई पचोरी मुलगा दीपक पचोरी आणि दुसरा मुलगा गणेश पचोरी अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावं आहेत. त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची माहिती समोर येत आहे. विजय पचोरी हे सेवानिवृत्ती शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहेत. कुटुंबातील चौघांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.