नागपूर : बाळासाहेब ठाकरे सवंगडी समजायचे हे मात्र घरगडी समजतात. शिवसेनेत आजपर्यंत मोजता येणार नाहीत एवढ्या केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळेचं कार्यकर्त्यांला मुख्यमंत्री करण्याचं काम बाळासाहेब यांनी केलं. शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.
किती विकास केला याचे साक्षीदार इथे आहेत. छाती ठोकपने सांगतो, अनेक योजना देऊन सिंचनाचं काम केलं, मात्र यांनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणासाधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, योजनांसाठी निधी देण्यासाठी मागील सरकारकडे पेन नव्हता मोजका निधी दिला, माझाकडे दोन पेन आहे, शेकडो कोटी निधी दिला आहे. लोकांचे जीव वाचत असतील तर हात आखता घेणार नाही. ही लेना बँक नाही तर देना बँक आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आपल्या पक्षात कोणी मालक नाही, जो काम करेल तो आपल्या पक्षात राजा असेल. उद्या तुमच्यातील एखादा कर्तृत्वाच्या जोरावर मुख्यमंत्री झाला तर मला सर्वात जास्त आनंद होईल, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
…म्हणून आम्ही उठाव केला
मला मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता, पण धनयुष्यबाण वाचवायचा होता. त्यांना खुर्चीचा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही उठाव केला. महायुतीत आल्यानंतर सरपंच निवडून आले. आपण भूमिका चुकीची घेतली असती तर तुमाणे सोबत आले असते का? असा सवालही त्यांनी केला. लोकहिताचे निर्णय घेत असतांना पीक विमा दिला. नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी काम केलं
विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकेल
विदर्भात महायुतीचं अतिशय चांगलं वातावरण आहे. मी रामटेकच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरायला गेल्तो. गडकरींचाही अर्ज भरायला गेलो होतो. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकेल. अशा प्रकारचं वातावरण या भागात आहे. रामटेक, यवतमाळ-वाशिम हे दोन्ही मतदारसंघ, मोठ्या फरकाने बहुमताने महायुतीचे होतील. असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.