अकोला: विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणावले. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे या भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शेगांव तालुक्यातीलही काही गावांना धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.