भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार पांजरा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्यांनीचं मालकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मालकाच्या शरीराचे लचके तोडल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ डिसेंबरची असून याचा व्हिडिओ आणि काही फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत आहे. या घटनेने भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. विलास पडोळे असं कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नावं आहे.
नेमकं काय घडलं?
पडोळे यांच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. नेहमी प्रमाणे ३१ डिसेंबरच्या दुपारी ते कुत्र्यांना घराबाहेर फिरायला घेवून गेले होते. यावेळी दोन्ही कुत्र्यांचे बेल्ट पडोळे यांनी स्वतःच्या हाताला बांधले होते. यावेळी दोन्ही कुत्र्यांनी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे बेल्ट मालक पडोळे यांच्या हाताला बांधलेलं असल्यानं सुटका झाली नाही.
आणि त्यातूनच चवताळलेल्या कुत्र्यांनी मालकावरच हल्ला चढवून शरीराचे लचके तोडले. स्थानिक नागरिकांनी त्यांची कशीबशी सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर आता पुढील उपचार नागपूर इथं करण्यात