नागपूर : उकळते पाणी अंगावर पडल्याने एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना 6 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मितांशी मेश्राम असं मृत चिमुकलीचे नाव आहे. मितांशी शनिवारी (दि. 6 जुलै) रोजी रुममध्ये खेळत होती त्यानंतर खेळता खेळता ती बाथरुममध्ये गेली. बाथरुममध्ये बादलीत उकळते पाणी ठेवले होते. उकळते पाणी तिच्या अंगावर पडले. त्यावेळी चिमुकली जोरात किंचाळली, तेवढ्यात तिच्या आईने धाव घेतला. चिमुकली गंभीर जखमी झाली होती.
मितांशीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले आठ दिवस तिच्यावर उपचार सुरु होते. काल (दि.14 जुलै) रविवारी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.