अमरावती : आईने घेतलेले पैसे परत न केल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमरावतीत घडली. या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकोला येथील आरोपी तस्वर खान जबीर खान (वय 35), इम्रान खान (वय 30), मुशर्रफ खान अफसर खान (वय 30) व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपींकडून काही पैसे उसने घेतले होते. त्यामुळे आरोपी पीडितेच्या घरी ये-जा करू लागले. 16 एप्रिल 2024 रोजी मुलगी बाहेर असताना तिला तिच्या आईने चहा घेण्यासाठी घरी बोलावले असल्याचा फोन आला. अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली तेव्हा सर्व आरोपी तेथे उपस्थित होते. पीडित मुलगी कपडे बदलण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली असता आरोपी तस्वर खान, जाबीर खान, इम्रान खान आणि मुशर्रफ खान यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
उधार घेतलेले पैसे परत न केल्याने आरोपीने महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने अल्पवयीन मुलगी चांगलीच घाबरली होती. त्यानंतर अखेर अल्पवयीन मुलीने येवदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.