Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयात बँक घोटाळा प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली.
सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर केदार यांना जामीन मंजूर केला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.