भंडारा : राज्यात सद्या सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेचि चर्चा आहे. अशातच आता एका शेतकरी पुत्राच्या मागणीची राज्यात चर्चा होत आहे. शेतकर्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा. अशी मागणी केली आहे भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने. शेतकर्यांच्या मुलांचे काही कल्याण होईल, अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, यासाठी या शेतकरी पुत्रान चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून सऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना!
राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन मिळणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती आहे. त्यात तो भात पिकासह बागायती शेती करून उत्पन्न घेत आहे.
शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्यांनं बोलून दाखविली आहे. या युवा शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे केलेल्या अशा प्रकारच्या अभिनव मागणीची आता गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही भावना गांव खेड्यातील प्रत्येक तरुण शेतकरी तरूणांनाची असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.
लाडकी बहीण योजनेतील पाच बदल
राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या नव्या जीआरबद्दल आपल्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. या सरकारी निर्णयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. पण या बदलांपैकी प्रमुख पाच बदल हे फार महत्त्वाचे आहेत.
पाच नियम कोणते?
1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
3) योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
4) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.
5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भआगातील बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.