अकोला: अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे रेल्वेच्या जागेत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाजवळ चक्क छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यामधील एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून गांज्याची लागवड करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या कृषी नगर परिसरातल्या रेल्वेच्या जागेत गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी कारवाईत संपूर्ण गांजाची झाडे उध्वस्त केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भिंतीला लागून आणि अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिस याप्रकरणी गांजा लागवड कुणी केलाय? याचा शोध घेत आहेत. कारवाईनंतर अकोल्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.