वर्धा : घराच्या आवारात खेळत असलेला पाच वर्षीय बालक अचानक गरम दूध असलेल्या भांड्यात पडला. यात तो गंभीररित्या भाजल्या गेला. त्याचा उपचारादरम्यान नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी खरांगणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
दक्ष अनिल काकडे असे या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. तो माळेगाव (ठेका) येथील रहिवासी असलेल्या अनिल काकडे यांचा मुलगा आहे. दक्ष हा घराच्या आवारात खेळत होता. पलंगावर खेळत असताना अचानक तो गरम दूध असलेल्या भांड्यात पडला.
यात दक्ष हा गंभीररित्या भाजल्याने सुरूवातीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.