नागपूर: नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निलंबित करण्यात आलेल्या सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करत अंतिम निर्णय मात्र राखून ठेवण्यात आला. सुभाष चौधरी यांनी कुलगुरू पदावरून निलंबन झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निलंबनाविरोधात धाव घेतली होती.