Bachchu Kadu : बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांना सद्या पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून जीवाला धोका असल्याची माहिती दिली आहे. अशी माहिती समोर येत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आमदार बच्चू कडू यांनी स्वत: या संदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. गोपनीय
मिळालेल्या माहितीनुसार, माझ्या जीवाला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची अफवा कुणाकडून तरी पसरवली आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा असून, बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे एक आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात.