चंद्रपूर : निर्भय बनो या माध्यमातून अँड असीम सरोदे यांच्यासह इतर मंडळींनी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. त्या सभेत असीम सरोदे यांनी शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परतणार असल्याचा दावा केला होता. तसेच या सभेत सरोदेंनी थेट या १२ आमदारांच्या नावाची यादीच वाचून दाखवली होती.
या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार, असं या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.
काय म्हणाले होते असिम सरोदे?
शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला होता. चंद्रपूर येथील ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना त्यांनी याबाबतचे विधान केले होते. तसेच या आमदारांची यादीही त्यांनी वाचून दाखवली होती. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत असिम सरोदे यांना नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असं म्हटल आहे.