अमरावती : स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या सततच्या अपयशांना कंटाळून अमरावती महिलेने आत्महत्या केली आहे. श्रद्धा मोडक (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रद्धा ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अनेकदा परीक्षेत यशाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिल्याने ती नैराश्यात होती. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली आहे.
श्रद्धा ही पती निखिल मोडक (३४) याच्यासमवेत अंजनगाव सुर्जी येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहत होती. मूळचे वणी येथील हे दाम्पत्य. निखिल हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर श्रद्धा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने खाली काढले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता.
निखिलने घटनाक्रम पोलीस ठाण्याला कळविला. पोलीसानी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.आत्महत्येपूर्वी श्रद्धाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात पती, सासू, सासरे यांना दोष देत नाही. बँकिंग परीक्षेत वेळोवेळी अगदी थोडक्या गुणांनी क्रमांक हुकल्याचे लिहिले होते. तिने नैराश्येच्या गर्तेत जाऊन आत्महत्या केल्याचे यातून समोर आले.