अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी त्यांनी एमआयएम नेते ओवेसी यांच्यावर आरोप केले आहेत. या धमकी प्रकरणी खासदार ओवेसी यांची देखील चौकशी करत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं राणा यांनी म्हटलं आहे.
ओवीसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे? हे लवकरचं सर्वांसमोर येईल. काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनेकदा ओवेसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या येतात. त्यामुळे यावेळीही त्यांचं काही कनेक्शन आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
मला मिळालेली धमकी ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानहून आली आहे. यामध्ये बड्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नावं घेतली आहेत. माझे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणे झाले आहे. याची एटीएस चौकशी लागली आहे. देशाला उडवून देण्याची धमकी दिली ती कोणी दिली? याचीही गृहविभागाकडून चौकशी सुरू आहे.
खासदार नवनवीत राणा यांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता आलेली धमकी ही भारताबाहेरून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचं कनेक्शन खासदार ओवेसी यांच्याशी असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राणा यांच्या तक्रारीनंतर धमकी देणाऱ्याविरोधात 354, 354A, D, 506(2) 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.