भंडारा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आला आहे. निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु झाला आहे. या दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून सोमवारी (11 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मोठा दावा करण्यात आला होता. अशातच भंडारा येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडे केली. यावरून भरारी पथकानं मिठाईचं सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे बघायला मिळालं.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी 175 जागा जिंकेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर भंडारा येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडे केली.
यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभेतील मांडेसर या गावात काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मोहाडी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर प्रकरण निवळलं.