मानोरा : विवाहित महिलेस पत्नीचा दर्जा न देणे, कार घेण्यास वडिलांकडून पैशांचा तगादा लावणे, अनैसर्गिक कृत्य करून मानसिक छळ करणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मानोरा पोलिस ठाण्यात आरोपी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पती सुनील दातार, सासरा अनिलराव दातार, सासू नंदोई, नणंद व एक महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोरा येथील एका शिक्षकाच्या मुलीचा विवाह यवतमाळ येथील सुमित अनिलराव दातार याच्यासोबत मे 2022 मध्ये कारंजा येथे झाला. लग्नात विवाहित महिलेच्या वडिलांनी भरपूर पैसा खर्च केला. लग्न झाल्यावर तीन महिने पतीने चांगली वागणूक दिली.
कामानिमित्त फिर्यादी महिलेचा पती ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. त्या महिलेस तो घरी घेऊन यायचा. जेवण करायचा. याला विरोध केला असता तो पत्नीला त्रास द्यायचा. इच्छा नसताना जबरदस्तीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा.
दरम्यान, पुनावडे येथे सासरची मंडळी भेटण्यासाठी आली असता सासू, सासरे, नंनद व नंदोई यांना घडला प्रकार सांगितला. पण त्यांनी महिलेचाच विनयभंग केला. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली.