भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात मोठा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या अपघातात भरधाव टिप्परने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सातोना – बीड मार्गावर घडली आहे.
करण बांते (वय 18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सातोना – बीड मार्गावरुन आज सकाळी करण बांते हा आपल्या बहिणीला महाविद्यालयात सोडून दुचाकीने गावाकडे परत येत होता. त्यावेळी करण हा दुचाकीवरुन जाताना भरधाव टिप्परने त्याला चिरडले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात परिसरातील नागरिकांनाी आक्रोश व्यक्त केला. तसेच ट्रकला घेराव करुत त्याला अडवून ठेवले.
अपघातानंतर ट्रकचालक तेथून पसार झाला असून त्यावेळी नागरिकांनी रस्ता अडवून ठेवत आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, वरठी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करता आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.