वर्धा : वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. या स्फोटात 17 कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी व गंभीर जखमी झालेल्या कामगारांना शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वर्धा जिल्ह्यातील भुगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. फर्निश विभागाजवळ झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली. या दुर्घटनेतील गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. कंपनीत मेटल ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साइड यांचे मिश्रण असलेल्या स्लॅगच्या कुलिंग प्रक्रियेदरम्यान हास स्फोट झाला आहे.
दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.