वाशिम : वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडल्याचे समोर आले आहे. एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसने दुचाकीला ५० फुटापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसने दुचाकीला ५० फूटांपर्यंत फरफटत नेले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी काही काळ अकोला – हैद्राबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेले दोघेही वाशीमच्या उकळी पेन गावचे रहिवासी अल्याची माहिती समोर येत आहे.