पुणे : सोलापूरहून मुंबईला कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना १२ ते ४ हा खूप कमी कालावधी मुंबईत मिळतो. त्यामुळे ही गाडी उशीरा सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. या मागणीला प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारत ट्रेनला काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई आणि सोलापूर या प्रवासातील वेळेची बचत करणाऱ्या या रेल्वेला पहिल्या आठवड्यात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अन्य गाड्यांपेक्षा ‘वंदे भारत’ चं तिकीट जास्त असलं तरी प्रवाशांच्या संख्येवर याचा परिणाम झालेला नाही त्याचवेळी या गाडीच्या वेळेबाबत सोलापूरमधील प्रवाशांनी तक्रार केली असून त्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून हि माहिती देण्यात आली आहे.
सोलापूरहून मुंबईला दुपारी १२ वाजता वंदे भारत गाडी पोहचते. त्यानंतर दुपारी चार वाजता ती पुन्हा सोलापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते. सोलापूरहून मुंबईला कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना १२ ते ४ हा खूप कमी कालावधी मुंबईत मिळतो. त्यामुळे ही गाडी उशीरा सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यानंतर प्रवाशांनी गुरुवारी आणि शुक्रवारी प्रवास करण्यावर अधिक भर दिला असल्याची माहिती समोर आली आहे. वंदे भारतचं तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना दोन ते तीन दिवस आधी रिझर्वेशन करावे लागत आहे. या ट्रेनमुळे इतर ट्रेनवर अजून कोणताही परिणाम झालेला नाही. सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्यांची तिकीटं बुकिंग करण्यासाठी वेटिंग कायम आहे.
ऑटोमॅटिक डोअरमध्ये थोडे बदल करण्यात येणार..!
दरम्यान, ‘रेल्वेचे जनरल मॅनेजर मागच्या आठवड्यात सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी आम्ही प्रवाशांच्या मागण्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत. त्याप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते सोलापूर गाडीच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक डोअरमध्ये थोडे बदल करण्यात आले असून त्याबाबतची अडचण येत्या काळात दूर होईल,’ संध्याकाळी पाच नंतर उपनगरीय गाड्यांची संख्या वाढते. या गोष्टीचाही विचार वेळ बदलताना केला जाईल अशी माहिती सोलापूर रेल मंडलचे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी दिली आहे.