मुंबई : देशात आधुनिक काळात काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. केरळ येथील कोझिकोड येथे देशातील पहिल्या तृतीयपंथी जोडप्याला बाळ होणार आहे. यामुळे याचीच देशात चर्चा सुरू आहे.
या जोडप्यातील ट्रान्सपुरूष गरोदर असून जहाद पावल असे त्याचे नाव आहे. देशातील ही पहिलीच घटना आहे. सध्या यासंबंधीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, ट्रान्स पुरूष जहाद पावल आणि ट्रान्सवुमन झिया हे मागच्या तीन वर्षापासून सोबत राहतात. तर त्यातील जहाद आता गरोदर असून तो गरोदर होणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरूष आहे. यामुळे त्यांना याची उत्सुकता लागली आहे.
बाळासाठी जहादची स्त्रीपासून पुरुषात बदलण्याची प्रक्रिया काही दिवस रखडली होती. अनेक युजर्सने या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत, याबाबत त्याची सहकारी झिया यांनी माहिती दिली.