पुणे : हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वीच राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत पाणाने दमदार हजेरी लावली. काल मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. धुळ्यात काल जोरदार गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणाच नुकसान झाले आहे. असे असतानाच पुन्हा हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
पुण्यातील प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती ट्विटवर दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्र दाट ढगांची गर्दी झाली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि विदर्भातील पश्चिम भाग, मराठवाड्यातही दाट ढग दाटून आले आहेत. असे त्यांनी सांगितले आहे.
दारम्यान, सर्व भागात पुढील तीन ते चार तासात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरु होता. तसेच पुण्यात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पावसाचे वातावण झाले होते. त्यामुळं पुणे शहरासह जिल्ह्यातील हवेत थंडावा जाणवत आहे.