पुणे : एक मे पासून देश आणि महाराष्ट्रात काही बदल केले जाणार आहे. त्या होणा-या बदलामुळे तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गॅस सिलेंडर, खासगी बॅंका, क्रेडिट कार्ड अशा ब-याच गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
– महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये आता आवश्यक कागदपत्रांवर आईचं नावं असणं अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी 1 मे 2024 पासून होणार आहे. त्यानुसार बाळाचे जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची कारवाई, आधार कार्ड आणि पॅनकार्ड यावर आईचं नाव अनिवार्य असणार आहे.
– दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होत असतो. त्यानुसार गॅसच्या किमतीत 1 मे रोजी बदल होण्याची शक्यता आहे.
– खासगी क्षेत्रातील एस बॅंकसुद्धा 1 मे पासून आपल्या सेव्हिंग अकाऊंटच्या अनेक सेवामध्ये बदल करणार आहे. बॅंक आपल्या किमान सरासरी शिल्लक रकमेमध्ये सुधारणा करणार आहे. त्यासोबतच अकाऊंट प्रो मॅक्समध्ये किमान बॅलन्स हा ५० हजार रुपये असणे आवश्यक आहे.
– आयसीआयसीआय बॅंकेने डेबिट कार्डच्या वार्षिक फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मे पासून नवे चार्जेस लागू होणार आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी 200 रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 99 रुपये वार्षिक फी असणार आहे.