पुणे प्राईम न्यूज डेस्क: कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराच नाव जरी काढलं तरी धडकी भरते. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात पसरू शकतो यावरून त्याचे अनेक नावे पडले आहेत. जसे ब्रेस्ट कॅन्सर,पशाचा कैन्सर, तोडाचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर याबद्दल ऐकलेले असते पण निदाना बाबत लोकाना फारशी माहिती नसते. किटनीमध्येही कॅन्सर होतो म्हणजे किडनीच्या पेशीमध्ये कॅन्सर व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू शरीराच्या इतर भागातही पोहोचू शकतो.
रेमा हा किडनीच्या कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. किडनीच्या कॅन्सरवर वेळेवर उपचार करणं खूप महत्वाचं आहे. हा किडनीचा कॅन्सर नियंत्रणाबाहेर गेला तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र शरीर तुम्हाला या कॅन्सरचे संकेत असतं तुम्ही ही लक्षण ओळखली पाहिजेत जाणून घेऊया वा कॅन्सरची कोणती लक्षणे दिसून येतात.
भूक न लागणं
तुम्हाला भूक लागत नसेल तर त्याला साधारण समजू नका. कारण हे देखील सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकत लघवीत रक्त येण्यासोबतच भूक कमी होत असेल तर डॉक्टराचा सल्ला घ्यायला हवा.
कंबरेत वेदना होणं
मूत्रपिंड हे पोटाच्या मागे असल्याने किडनीचा कॅन्सर झाल्यास कंबरेत तीव्र वेदना होऊ लागतात. तीव्र पाठदुखी हे सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे कंबरेमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. जर तुम्हाला सतत या वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्याला पाहिजे.
लघवीतून रक्तस्राव होणं
लघवीतून रक्तस्राव होणं हे किडनी कॅन्सरचं सुरुवातीच्या टप्प्यातलं सामान्य लक्षण असू शकते. जर तुम्हाला लघवीमध्ये रक्त येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनीचा कॅन्सर झाल्यास लघवीला दुर्गंधी येऊ शकते. याशिवाय लघवीमध्ये फेस देखील दिसू शकतो.
वजन अचानक कमी होणं
अचानक वजन कमी होत असेल तर किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. किडनीच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाचं वजन कमी होऊ शकत. इतर अनेक कारणांमुळे वजन कमी होऊ शकतं. खर कारण शोधण्यासाठी किडनीच्या कॅन्सरसंबंधी चाचणी करणं आवश्यक आहे