नागपूर: नागपूर येथील इमामवाडा भागात जटतरोडी पोलिस चौकी हद्दीत दोन तरुणांनी दिवसाढवळ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केली. पीडित नरेश वालदे याने आपल्या मुलीच्या छेड काढली म्हणून तरुणांना खडवले होते. याचाच राग मनात ठेवून आरोपींनी मुलीच्या वडिलांची हत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नितेश मेश्राम उर्फ नाना गेल्या चार वर्षांपासून वालदेच्या मुलीला त्रास देत होता. वालदेने मेश्रामला त्याच्या मुलीला त्रास देणे थांबवण्याचा वारंवार इशारा दिला होता, परंतु तो काहीही करून ऐकत नव्हता.
पीडितेने आरोपीविरुद्ध दाखल केली होती तक्रार
वालदे यांनी मेश्रामला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी ऐकले नसून मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेच्या एक दिवस आधी नरेश यांच्या घरावर काही तरुणांनी दगड फेकही केली होती. या विरुद्ध तक्रार दाखल केली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. हत्येच्या दिवशी मेश्राम आणि त्याचा साथीदार ईश्वर सोनकुवर उर्फ जॅकी यांनी वालदे त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि घटना स्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.