पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंडन मधून थेट पुण्यात येऊन तरुणीने आपला मतदानाचा हक्क आज रविवारी (ता.२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास बजाविला आहे.
अमृता देवकर असे मतदानासाठी आलेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता देवकर यांचे लहानपण पुण्यात गेले आहे. तर आता त्या लंडन येथील मँचेस्टर येथे राहते. आज मतदानासाठी पुण्यात आल्या आहे. यावेळी त्या कुटुंबियांसोबत आल्या होत्या. त्यांनी यावेळी पुण्यातील विविध आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना अमृता देवकर म्हणाल्या कि, मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते सर्वांनी बजावले पाहिजे. मतदानाचा हक्क कोणीही गमावू नका, असा संदेश त्यांनी दिला आहे.