Samruddhi Highway Accident News : बुलढाण्यातील सिंदेखड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे राज्याच नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. अपघातात एकाच ओळीत 25 जणांचा मृत्यू झाल्याने देशात हळहळ व्यक्त केली जात आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले
या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. तसेच मदतीची घोषणा केली आहे.
शरद पवारांची केली टीका…
या अपघातानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. (Samruddhi Highway Accident News) शरद पवार म्हणाले, या महामार्गाचे सायंटीफिक नियोजन केलं नसावं, त्याचाच दुष्परिणाम लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आता चर्चा अशी आहे एखादा अपघात झाला आणि एखादा मृ्त्यूमुखी पडला की लोक असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला, असा टोला पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
सुरक्षितता उपाययोजना करा – अजित पवार …
समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. (Samruddhi Highway Accident News) तसेच नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा –सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी असल्याची संवेदना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
नोकरीसाठी सिलेक्शन झाले पण…
बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस रामदास पोकळे याने आपल्या कर्तूत्त्वाच्या जोरावर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. (Samruddhi Highway Accident News) याच ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाचे धडे घेत असताना त्याने महाविद्यालयीन कॅम्पसला पुढे जात मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्याची बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी सिलेक्शन केले.
ही वार्ता कुटुंबियांना दिल्यावर तेजस वर्धेला परतला. कुटुंबियांसोबत काही दिवस घालवल्यावर तो शुक्रवारी पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने रवाना झाला. भरधाव ट्रॅव्हल्स बुलढाणा जिल्ह्यात एन्ट्री होत पुण्याच्या दिशेने रवाना होत असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला. याच अपघातात तेजस रामदास पोकळे याचा मृत्यू झाला.
आई-बाबा, मी लवकर परत येते………….
आई-बाबा, मी लवकर परत येते, असे म्हणत राधिकाने आई-वडिलांचा निरोप घेतला. पुण्यात एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर सोमवारी शैक्षणिक सत्र सुरू होणार होते. त्यामुळे तेथे उपस्थित राहण्यासाठी राधिका निघाली. मात्र, ती आई-वडिलांशी शेवटचे बोलतेय, हे तिच्या गावीही नव्हते. (Samruddhi Highway Accident News) कारण काही तासातच तिच्या ट्रॅव्हल्सला सिंदखेड राजानजीक आगीने वेढले. यात राधिकाचादेखील कोळसा झाला. इकडे ही वार्ता धडकताच तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू होता.
सिंदखेड राजानजीक नागपूरहून पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यात ३३ पैकी २५ प्रवासी भाजून मृत्युमुखी पडले. यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव (मंगरूळ) येथील मूळ रहिवासी असलेली राधिका महेश खडसे (२२) ही तरुणीदेखील होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरण: केसमधील मोठी माहिती आली समोर