केडगाव (अहिल्यानगर): अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि अनैसर्गिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. रावण नावाच्या ग्रुपने परिसरात दहशत माजवली आहे. गुन्हेगारी विचारांच्या तरुणांनी एकत्र येत हा ग्रुप बनवला आहे. यात जवळपास 10 ते 15 तरुणांचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी 3 मुलांचे अपहरण करून टोळक्यातील 10 ते 15 तरुणांनी आळीपाळीने 3 पिडीतांवर अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकरणातील आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.
तरुणांनी केलेले कृत्य उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पोलिसांनी तरुणांना धडा शिकवण्यासाठी अटकेनंतर संबंधित आरोपींची गुरुवारी परिसरात धिंड काढण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात आरोपींची धिंड काढण्यात आली असून नागरिकांच्या उपस्थितीत आरोपींना पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे.