पुणे : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला. या योजनेतून आतापर्यंत जुलै ते मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.पुढचा हप्ता कधी मिळणार, किती मिळणार, कोणत्या महिला त्यात अपात्र ठरणार अशा अनेक चर्चा रंगल्या असताना 9 लाख अपात्र महिलांच्या खात्यावर पैसे येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच टेन्शन वाढल आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली. आता लाडक्या बहिणींच एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागला असताना अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापासून लाभार्थींच्या खात्यावर हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 2100 नाही तर नेहमीप्रमाणी लाभार्थींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होतील. ज्यांचा गेल्या महिन्यातील हप्ता शिल्लक राहिला आहे त्यांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या योजनेतून 9 लाख महिलांना बाद केलं जाणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच घेता येणार आहे. ज्या महिलांच्या खात्यावर पैसे येणार नाहीत त्या या योजनेत अपात्र ठरल्याचं समजून जावं. त्याची नाव यादीतून बाद केली जातील त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत. लाभार्थींची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची चिंता आता वाढली आहे.