नवी दिल्ली : सध्या अनेक ब्लूटूथ स्पीकर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात स्विस मिलिटरी ब्राउन रेट्रो क्लासिक ब्लूटूथ स्पीकर हा एक प्रीमियम असा आहे. स्टायलिश डिझाइन आणि मजबूत बिल्डसाठी ओळखला जातो. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये FM Stereo Sound, AUX, Micro USB, USB A सपोर्ट, दर्जेदार बॅटरीही मिळत आहे.
डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी बेस्ट अशी ठरत आहे. त्याची रेट्रो क्लासिक डिझाइन इतर स्पीकर्सपेक्षा हटके बनवते. याची बिल्ड क्वालिटी तुम्हाला आवडणारी अशी ठरू शकते. याची निर्मिती दर्जेदार मटेरिअलपासून बनविली गेली आहे. यामुळे ते दीर्घकाळ टिकण्यास सक्षम होते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही यामध्ये मिळत आहे. ज्यामुळे तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोन किंवा इतर गॅजेट्सशी सहजपणे कनेक्ट करू शकता.
साउंड क्वालिटीही चांगली आहे. या स्पीकर्सच्या आउटपुटमध्ये चांगला बास आणि क्लिअर मिड-रेंजही आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला ऑडिओ अनुभवता येऊ शकतो. तसेच याची बॅटरी लाईफही चांगली आहे. हा प्रीमियम स्पीकर लाँग लास्टिंग बॅटरी देते. यातून तुम्ही 6 तासांपर्यंत गाणी ऐकू शकता.