अकोल्यातील एका युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीने दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंजली असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. अंजली ही विद्यार्थिनी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहून यूपीएससीची तयारी करत होती. मात्र 21 जुलै रोजी तिने आत्महत्या केली. तसेच तिने एक सुसाईड नोट लिहून ठोकाचे पाऊल उचलले. या घटनने मोठी खळबळ उडाली आहे.
अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये पेइंग गेस्ट सुविधा आणि हॉस्टेलच्या महागड्या खर्चाचाही उल्लेख आहे. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना कोणत्या दबावाला सामोरे जावे लागत आहे, हे देखील सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलं आहे. तसेच दैनंदिन समस्याच्याही नोंदी केल्या आहेत.
अंजलीने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे माझे स्वप्न होते.
पण मी किती चंचल आहे हे सर्वांना माहीत आहे, कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. अनेक तरुण नोकरीसाठी धडपडत आहेत, पीजी आणि वसतिगृहाचे भाडे कमी करणे आवश्यक आहे. हे लोक केवळ विद्यार्थ्यांकडून पैसे लुटत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, असं अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.