( Maharashtra Budget 2023 ) मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे (budget)राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी महिला आणि बालक यांच्या बद्दल अर्थसंकल्पातील विविध तरतुदी जाहीर केल्या. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शिंदे सरकारने अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका ( helpers ), मदतनीसांची 20,000 पदे ( posts )भरणार असल्याचे जाहीर केले असून मानधनात (salary) देखली भरीव वाढ करण्याचे जाहीर केले आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ…
– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
– गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
– अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
– अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
नवरात्रीनिमित्त मुख्यमंत्र्यांची महिलांसाठी मोठी घोषणा
पुण्यासह मुंबईत शिंदे गटाची बॅनरबाजी ; उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा
महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीसांनी शेअर केलेल्या ;या; गाण्याची जोरदार चर्चा