Solapur Crime | सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर ( Solapur Crime )१५ लाख रुपयांचे ३०७ किलो चंदन चोरून घेऊन जाणाऱ्या तीन चोरट्यांनी चक्क पोलीस पथकाच्या अंगावर टेम्पो घातल्याची घटना घडली आहे.
देवडी (ता. मोहोळ) ग्रामपंचायत हद्दीतील फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत पोलीस पथक थोडक्यात बचावले असून आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी चालकासह तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण उर्फ बिनू दाडे, शंकर दाडे व टेम्पोचालक विनोद खडूळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी १५ लाखांचे ३०७ किलो चंदन, एक टेम्पो असा ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी देवडी फाट्याजवळ सापळा रचला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातून एका टेम्पोतून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी देवडी फाट्याजवळ सापळा रचला होता. पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास वाफळे येथून टेम्पो येताना दिसला.
दरम्यान, पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा करून पोलीस वाहनाचे दोन्ही दिवे सुरू केले. पोलिसांची गाडी पाहून टेम्पोचालकाने पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उड्या मारल्याने ते बचावले. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो ताब्यात घेतला मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले आहेत. तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर
MSRTC : शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचे स्थलांतर होणार