मुंबई : राज्यातील राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून बऱ्याच घडामोडी घडललेया दिसून आलेल्या सर्वांनी बघितल्या आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते रोज एकमेकांच्या विरोधात गर्द ओकत असतात. परंतु जुन्या शिवसैनिकांकडून अजूनही दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे, असा सूर अधून मधून निघत असतो. मध्यंतरी मुंबईत दोन्ही शिवसेने एकत्र यावे, असे बनर्सही लागले होते. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले कि..
शिवसेनेची खरी दौलत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. परंतु काही लोकांची निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दैवत वाटत आहेत. त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे. त्याच गोष्टींचा आम्हाला त्रास होत होता. म्हणूनच आम्ही बाहेर पडलो. आताही त्यांनी त्यांची दिशी बदलली तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
अनिल पाटील यांना टोला..
आम्ही जो उठाव केला तो वेगळ्या भावनेतून केला आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार? ही आमची भूमिका आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेसाठी ८० जागांची मागणी केली आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. अनिल पाटील यांनी ८० नव्हे तर १०० जागा मागव्या, १५० जागा मागव्या पण पक्षाच्या बैठकीत मागव्यात. चॅनलवर बोलून त्यांना जागा मिळणार नाही. असे संजय शिरसाठ म्हणाले.