Shocking News : सोलापूर : माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. एका गरीब कुटुंबाला घरमालकाकडून अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह घरात आणण्यास घरमालकाने ठाम नकार दिला. केवळ अमावस्या असल्यामुळे मृतदेह घरात आणू देणार नाही, अशी आडमुठेपणाची भूमिका घरमालकाने घेतल्यामुळे वृद्ध आई व अपंग भावावर मृतदेह भर पावसात रात्रभर घराबाहेर ठेवण्याची नामुष्की ओढवली. सोलापूर येथील गोदुताई विडी घरकुल परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे.
अमावस्या असल्यामुळे मृतदेह घरात आणण्यास नकार
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर यल्लप्पा मुटकिरीरी (वय ४९, रा. गोदुताई विडी घरकुल) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकर मुटकीरी हा शिलाई कामगार होता. (Shocking News) गोदुताई विडी घरकुल परिसरात भाड्याने राहत होता. शंकरला लकवा मारल्याने नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला रूग्णालयात दाखल केले. सोमवारी दुपारी शंकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बाब ससाणे आणि वसीम यांना कळताच त्यांनी सिव्हिलमध्ये जाऊन डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण केली. व शंकरच्या एका नातेवाईकाकडे मृतदेह सोपवला.
दरम्यान, शंकरचा मृत्यू झाला त्यादिवशी अमावस्या होती. त्यामुळे शंकरच्या घरमालकाने आडमुठेपणाची भूमिका घेत मृतदेह घरात आणण्यास नकार दिला. मृत्यू झालेल्या शंकर मुटकिरीरी यांची आई नागमणी या वृद्ध आहेत, तर त्यांचा भाऊ अनिल हा अपंग असल्याने त्यांना अंत्यसंस्कार करणे अवघड झाले होते. (Shocking News) याप्रसंगी शंकरच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. परंतु, नातेवाईकांकडून कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे शंकरचा मृतदेह रात्रभर भर पावसात घराबाहेर ठेवण्याची वेळ आली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी पावसात भिजत असलेल्या पार्थिवाचे मन हेलावणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सामाजिक कार्य करणाऱ्या वसीम मुल्ला, विल्यम ससाणे आणि इतर नातेवाईकांनी मंगळवारी गोंदुताई विडी घरकुल गृहनिर्माण सोसायटीच्या निधीतून शंकरवर अंत्यसंस्कार केले. (Shocking News) अंत्यसंस्काराला पाच ते सहा नातेवाईक हजर झाले.
शंकरचा भाऊ अनिल हा ४५ वर्षांचा असून तो अपंग आहे. आई नागमणी या ६५ वर्षांच्या आहेत. शंकर हा घरात एकमेव कमावणारा होता. शंकरच्या मृत्यूनंतर भाऊ अन् आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Shocking News) अपंग, गरीबांना मिळणाऱ्या हिन वागणुकीचा प्रत्यय या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला. या घटनेबाबत संतप्त प्रिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shocking News : धक्कादायक! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं; पोलिसाचा जागीच मृत्यू
Shocking News : लग्न समारंभावरून परत येताना बोट उलटून १०० जणांचा मृत्यू; नायजेरिया देशातील घटना