अहमदनगर : अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ एक मोठी घटना घडली आहे. बुधवारी प्रवरा नदीमध्ये दोन जण बुडाल्याची माहिती होती. यामधील एका व्यक्तीच्या शोधण्यासाठी गुरुवारी सकाळी SDRF च्या पथकाला बोलण्यात आले होते. मात्र यावेळी प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली आहे. या दुर्घटनेत पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आपात्कालीन परिस्थितात बचावकार्यासाठी एसडीआरएफच्या जवानांना प्राचारण करण्यात येतं. पण त्यांचाच मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट बुडाली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले होते.