जरुड (जळगाव): जळगाव जिल्ह्यातील एक तरुणाने केलेल्या कामाचे कौतुक अनेकजण करतांना दिसत आहे. जरुड गावातील रहिवासी राजेश काकडे यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून आपल्या शेतात बोअरवेल खोदली, ज्यामुळे केवळ त्याच्या गावालाच नव्हे तर आजूबाजूच्या पाच गावांना पाणी मिळाले, त्यामुळे 5 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या गावकऱ्यांसाठी राजेश काकडे यांनी घेतलेली बोअरवेल जीवनरक्षक ठरली आहे. काकडे यांच्या दयाळू कृत्यामुळे हजारो लोकांना दिलासा मिळाला असून राजेश काकडे यांना आता जलदूत अशी ओळख मिळाली आहे.
राजेश काकडे यांनी त्यांच्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोअरवेल घेतला. पाण्यामुळे शेतातील बाजरी, डाळिंब आणि मोसंबीचे नुकसान झाले, परंतु हार न मानता राजेश यांनी पाण्यासाठीचे प्रयत्न सुरु ठवले, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. त्यांच्या निःस्वार्थ कृतीने दाखवून दिले आहे की एक व्यक्ती खूप काही करू शकतो.