अजित जगताप
Satara News | सातारा : सातारा जिल्ह्यातील हक्काचे पाणी मिळावे. यासाठी उरमोडी धरणाची निर्मिती केली. या धरणातील एक टी.एम.सी. पाणी कोरेगावच्या हक्काचे असताना ते सांगलीला नेण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे विलास काकांनी आणलेले हक्काचे पाणी बाहेर दिल्याचे पाप आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे. असा आरोप शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच लोकांच्या भावनेशी खेळ खेळून आंदोलन करण्यापेक्षा समोरासमोर येऊन चर्चा करावी. असेही आव्हानही त्यांनी केले आहे.
आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी २३ रोजी सातारा ,खटाव, कोरेगाव तालुक्यातील वंचित गावांना सिंचनाचे पाणी देण्याबाबत झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत अहवाल ही पत्रकारांसमोर सादर केला. या बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेश शिंदे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता धुमाळ ,नार्वेकर, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता सिंचन विभागाचे निकम आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
बहुतेक गावे वांगणा उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात…
सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णयानंतर निर्णय घेणे योग्य असे कार्यकारी संचालकांनी सांगितले आहे. या बैठकीमध्ये कोरेगाव तालुक्यातील अंबवडे, किन्हई, चिंचोली खेड, जाम खुर्द, हिवरे, कवडेवाडी, भोसे, चिमणगाव , भंडारमाची भाडळे गावांना बहुतल गावे वांगणा उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात आहेत. तथापि या गावांना सिंचनाचे पाणी मिळत नसलेल्या गावांना जिहे कठापुर योजने द्वारे पाणी द्यावे. रामोशी वाडी येथील वितरण उघडा कालवा काढून त्याखाली बाजू असणारे मौजे शिल्थ , खि रखिंडी वाघजाई वाडी, भाटम वाडी, अपशिंगे या गावांना पाणी देण्याबाबतही आमदार महेश शिंदे यांनी भूमिका घेतली आहे.
दुसरी पाईपलाईन टाकून पाणी देण्यासाठी प्रयत्नशील…
धरणाच्या खालील भागातील गावांनाही पाणी मिळावे. सातारा तालुक्यातील निगडी, देगाव देवकरवाडी कारवाडी व राजेवाडी या गावांसाठी कृष्णा नदी उपसा सिंचन योजना निर्माण करून पाणी देण्याची त्यांनी मागणी केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून ३७० कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणलेला आहे. जलसंपदा विभागाने चार इंचाच्या पाईप लाईन मधून एक टीएमसी पाणी देण्याचा जो प्रयत्न केला. दुसरी पाईपलाईन टाकून पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही गावांना वगळण्यात आलेला आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना तरतूद करता आली नाही. आज पाणी पूजन केले हा राग असून मी सुडाचे व दृष्ट राजकारण करत आहे. ते राजकारण मी का करत आहे? तर या शिंदे कुटुंबाचे अर्थकारण चोऱ्या थांबवण्यासाठीच मी राजकारण केले आहे. असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.
गेले ७५ वर्षे रामोशी वाडी सारख्या ठिकाणी टॅंकरने पाणी येत होतं पंचवीस वर्षे टँकरने पाणी द्यावे लागते. याची त्यांना खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे. मी तीन वर्षात दुष्काळ संपवला असून लाटी आंदोलनातून काही कार्यकर्ते पळून गेलेले आहेत.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांची अवस्था शोले मधील असराणी सारखी असून रिझल्ट ओरिएंटेड काम करत असल्याने कोरेगाव मतदार संघात विकास कामे होत असल्याचेही त्यांनी आकडेवारी मध्ये मांडणी केली.
दरम्यान, सातारा, खटाव, कोरेगाव दुष्काळग्रस्त तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावांना सिंचनाचे पाणी देण्याचे अनुषंगाने असणारा योजनांना जादाचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मंजुरी मिळावी. यासाठी आमदार महेश शिंदे यांनी आग्रही भूमिका घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara Crime : खळबळजनक ! ठाण्याच्या माजी नगरसेवकाने केला गोळीबार ; दोन जणांचा मृत्यू
Good News | राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २४ शेतकऱ्यांना नवीन विहीर