जीवन सोनवणे
Satara News : खंडाळा, (सातारा) : शनिवार – रविवारी दोन्ही दिवशी लागून आलेल्या सुट्टीमुळे व गणेशोत्सवामुळे गणेशभक्त तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. यामुळे खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
सुट्टी असल्यामुळे मुंबई आणि पुणे येथील पर्यटक महाबळेश्वर, कास, पाचगणी या ठिकाणी भेटी देण्यासाठी तर गणेशभक्त आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी दाखल होऊ लागले आहेत. (Satara News) खंबाटकी घाटमाथ्यावर सहाव्या वळणावर असणाऱ्या दत्त मंदिराच्या ठिकाणी ३ लेनचा घाट २ लेनचा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार ट्राफिक जाम होत असते.
परिणामी अशात या ठिकाणाहून जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं सकाळपासून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून घाटात निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त
खंबाटकी बोगदा परिसरात ट्रॅफिक जाम आहे. कासव गतीने वाहने पुढे सरकत आहेत. सातारा-पुणे येण्या-जाण्याच्या प्रवासाला तीन तासाहून अधिक वेळ लागत आहे. (Satara News) त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहने बंद..
सध्या खंबाटकी घाटात शनिवार पासून मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.याच कारणाने घाटामध्ये अनेक वाहने गरम होऊन बंद पडत असून वाहतुकीस मोठ्या प्रमाणत अडथळे निर्माण होत आहेत.(Satara News) बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी सोडविण्यात पोलिसांची दमछाक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : अजित पवार आमचे नेते… असे विधान मी केलेच नाही; शरद पवार यांचे घुमजाव
Satara News : साताऱ्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना थेट पाकिस्तानातून धमकी