अजित जगताप
Satara News : सातारा : सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाने शिरकाव केला आहे. त्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात आणि खाजगीकरणामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात. हे आता उघड झाले असून आनेवाडी नजीक विठाई बस पेटल्याने अनेक प्रश्नांचा धूर निघू लागलेला आहे. (Many questions have arisen after Vithai bus caught fire near Anewadi)
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी सेवेचे खाजगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून एस टी ची चाके आणखीन खोल रुतू लागलेले आहेत. (Satara News) एस टी महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी खाजगीकरणातून मॉल उभे राहिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला चालक वाहकांना आराम करण्यासाठी कोणती सुविधा नाही. असे असताना शिवशाही व विठाई या गोंडस नावाखाली एस टी महामंडळाने प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या खाजगी बसेस सुरू केलेले आहेत. या बसेसचे फार कौतुक झाले. मात्र, प्रत्यक्षात या बसची सुविधा म्हणजे नसून खोळंबा असून अडचण अशीच झाली आहे. अनेक ठिकाणी नादुरुस्त बसेस त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
बसमधील ४० प्रवासी सुखरूप
सातारा जिल्ह्यातील आनेवाडी ता. जावली या ठिकाणी असलेल्या टोलनाक्याने आज सकाळी सव्वा अकरा वाजता विठाई या बसने अचानक पेट घेतला. (Satara News) चालक सागर चौगुले व वाहक सोनल चौगुले यांनी प्रसंग ओळखून प्रवाशांना गाडीतून उतरविली . त्यानंतर गाडीने मोठा पेट घेतला. सदरची बस दीड तास जळत होती. या बस मध्ये ४० प्रवासी होते .या सर्व प्रवाशांना उतरल्यामुळे मोठा अपघात टळला.
सध्या आषाढी वारी निघाली असून शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री व अधिकारी प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या बाजूला पंढरपूर व भाविकांसाठी तयार केलेली विठाई बस पेट घेत आहे. चार वर्षांपूर्वी दिनांक २४ डिसेंबर रोजी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विठाई बसचे उद्घाघाटन करण्यात आले होते. (Satara News) सदर बस ची बांधणी पुणे येथील दापोडी मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या बसचे वितरण सर्वे विभागात झाले होते. सोमवार दिनांक १२ जून रोजी सकाळी राधानगरी कोल्हापूर येथून स्वारगेट कडे निघालेली एम एच ११ ८४१३ ही विठाई बस आनेवाडी टोल नाक्यावर आली असता इंजिनमध्ये दूर येऊ लागला. त्यानंतर हळूहळू ज्वाला भडकू लागल्यानंतर चालक व वाहकांनी प्रवाशांना बसमधून उतरवून सुरक्षित ठिकाणी हलवले.
सदर बस पेट घेत असताना आनेवाडी टोल नाक्यावर कोणतीही व्यवस्था नसल्याने अखेर सातारा नगरपरिषद येथून आलेल्या अग्निशामक दलाने पेट्या बसवर पाण्याचे फवारे मारले. (Satara News) विशेष म्हणजे टोल नाक्यावर अपघात नियंत्रण व निवारण करण्यासाठी यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु, आनेवाडी टोल नाक्यावर अशी कसलीही यंत्रणा नव्हती. एवढेच नव्हे तर टोल नाका प्रशासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे हा टोल नाका म्हणजे लुटीचाच प्रकार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सध्या वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीस यंत्रणा लाठीमार करत आहे. विठाई नाव दिलेले बस पेटत आहे.
असे असताना कोणत्या अर्थाने हिंदुत्वाचा नारा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकार राज्य करत आहेत. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .अशा हिंदुत्व पेक्षा राष्ट्रभक्ती व देशभिमानी असलेले सरकार महाराष्ट्रात यावे. अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला गती देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले त्याचबरोबर विठ्ठल रखुमाई यांनी वारकरी संप्रदाय जवळ करून अध्यात्मिक मार्ग निर्माण केला. (Satara News) आज त्याच मार्गावर धोका निर्माण झाला असून जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात व ज्यांच्या खाजगीकरणामुळे शिवशाही व मिठाई या बसेस ना दुरुस्त व आग लागून नष्ट होत आहेत. त्यामुळे ही दोन नावे या बसेसला न देता शिंदेशाही व पेशवाई असे नामकरण करावे अशी मागणी काही प्रवाशी व पुरोगामी महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी
Satara News : नूतन सातारा जिल्हाधिकारी सतिश दुडी यांनी पदभार स्वीकारला…