Sad News : मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (वय-९४) यांचे आज रविवारी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सुलोचना दीदी यांनी दादरमधील एका रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना लाटकर या श्वसनाच्या आजाराने गेल्या काही दिवसांपूर्वी त्रस्त होत्या. त्यांना उपचारासाठी दादरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साम ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांचे आज उपचारादरम्यान निधन झाल्याचे म्हटले आहे. (Veteran actress sulochana passed away)
दादरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
सुलोचना दीदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. दीदींनी, मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. तसेच दीदींनी आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला होता.(Sad News) चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते.
दरम्यान, सुलोचना दीदींचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. (Sad News) केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि त्या सात्विक चेहऱ्यावरील तेज चाहत्यांसाठी मोठी समाधानाची बाब होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sad News | शिंदवणे येथील गोरखनाथ खेडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..